बातम्या

INTRESTING | ट्रम्प बनले बाहुबली, स्वत:च शेअर केला व्हिडीओ

सकाळ न्यूज नेटवर्क

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे. त्यानंतर भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ रिट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प बाहुबलीच्या अवतारात दिसून येत आहेत.

जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोमवारी (ता.24)  भारत दौऱ्यावर येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. या दौऱ्यासाठी स्वतः ट्रम्पही बरेच उत्सुक आहेत. ट्रम्प यांनी पहाटे चारच्या सुमारास हा व्हिडिओ रिट्विट केला. त्यानंतर अडीच तासांत सुमारे 13 हजार यूजर्सनी याला रिट्विट केले असून, 50 हजार जणांनी लाईक केले.

Look so forward to being with my great friends in INDIA! https://t.co/1jdk3AW6fG

— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 22, 2020

अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प 11 किमीचा रोड शो करणार आहेत. हा रोड शो खास करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रोड शोसाठी रस्त्यामध्ये 28 स्वागत मंच तयार केले आहेत. 

पत्नी मेलानिया राहणार हजर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प येणार आहेत. इवांका ट्रम्प यांचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. 

Web Title: US President Donald Trump Shared Bahubali Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT